![]() |
| Marathi Live News |
जळगाव जिल्ह्यातील "होम वोटिंग" सुविधा मतदानाचा आज शेवटचा दिवस
१०३ वर्षाच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क
चाळीसगाव तालुक्यातील Marathi Live News तांबोळे (खुर्द ) या गावातील १०३ वर्षाच्या धोडगीर शंकर गोसावी यांच्या घरी जाऊन निवडणूक यंत्रणेनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार त्यांचा मतदानाचा हक्क मिळवून दिला. धोडगीर शंकर गोसावी यांचा जन्म १९२१ चा असून त्यांनी स्वातंत्र्य English Live News भारताचा सूर्योदय पाहिला आहे. भारताच्या पहिल्या निवडणुकी पासूनचे ते साक्षीदार असल्यामुळे त्यांचा मतदार म्हणून मत करतांनाच फोटो स्वातंत्र्याचे मोल सांगून जातो.
शनिवार (दि.४) जळगाव लोकसभा निवडणुकीचे सर्व सामान्य निरीक्षक राहुल गुप्ता यांनी जळगाव मधील होम सुविधा उपलब्ध असलेल्या पहिल्या ज्येष्ठांना प्रमाणपत्र दिले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद Hindi Live News यांनीही घरी जाऊन ज्येष्ठांच्या होम वोट' सुविधेची पाहणी केली. निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांनी 'होम वोटिंग सुविधा' उपलब्ध करून दिली. शनिवारी (दि.४) संध्याकाळ पर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारी नुसार तालूकानिहाय खालील प्रमाणे होम वोटिंग झाले. रावेर-१००, मुक्ताईनगर- १०६, भुसावळ- १०७, जळगाव शहर - १०७, जामनेर - ८४, चाळीसगाव ७६, जळगाव (ग्रामीण)- १०८, एरंडोल - ११६ आणि चोपडा - ४३ असे आहे.


.jpg)



.jpg)