Saturday, August 26, 2023

80 गंभीर; इंडियन ओशन आयलँड गेम्सचा उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी 50,000 प्रेक्षक आले होते Marathi Live News

            मदागास्करची राजधानी अंतानानारिवो येथील नॅशनल स्टेडीयममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जण ठार तर ८० जखमी झाले. इंडियन ओशन आयलँड गेम्सच्या उध्दाटन समारंभासाठी सुमारे ५०,००० लोक स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न Marathi Live News करत असताना हा अपघात झाला. वृत्तसंस्था एएनआयने अल जझारीच्या वृत्ताचा हवाला देत ही माहिती दिली आहे. मदागास्करचे पंतप्रधान ख्रिश्चन एनत्से यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांपैकी ११ जणांची प्राकृति चिंताजनक आहे. साध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 

Marathi Live News

प्राण गमावलेल्यांसाठी राष्ट्रपतींनी मौन पाळले 

उध्दाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आलेले मदागास्करचे राष्ट्रध्यक्ष अँड्री राजोएलिना यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. ही घटना दुर्देवी असल्याचे सांगून त्यांनी स्टेडियममध्ये उपस्थित लोकांना अपघातात प्राण गमावलेल्यांसाठी मौन Marathi Live News बाळगण्याचे आवाहन केले. यानंतर स्टेडियममध्ये होणारा कार्यक्रम सुरूच राहिला. 

याआधी २०१९ मध्ये मदागास्करमधील स्टेडियममध्ये अशाच एका घटनेत सुमारे १५ लोकांचा मृत्यू झाला होता. 

इंडियन ओशन आयलँडगेम्स ही एक बहु-विषय स्पर्धा आहे, जी ३ सप्टेंबरपर्यंत मदागास्करमध्ये होणार आहे. इंडीयन ओशन आयलंड गेम्सची निर्मिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने १९७७ मध्ये केली होती. त्यात मॉरिशस, सेशेल्स, कोमोरोस, मादागास्कर, मेयोट, रियुनियन आणि मालदीवमधील खेळाडूंचा समावेश आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...