Tuesday, August 22, 2023

पुण्यात बिबट्याची शिकार : फार्म हाऊसमध्ये आढळला नख्यांंसह पंजा ; बड्या व्यावसायिकावर गुन्हा दाखल Marathi Live News

Marathi Live News

 खडकवासला (पुणे) : 

खडकवासला धरणतीरावरील Marathi Live News  मांडवी खुर्द (ता.हवेली) परिसरात बिबट्याची शिकार झाल्याचा प्रकार वन विभागाच्या चौकशीत उघड झाला. याप्रकरणी पुण्यातील एका बड्या हाॅॅटेल व्यावसायिकावर पुणे वन विभागाने गुन्हा दखल केला आहे. गुन्हा दखल होताच हॉटेल व्यावसायिक फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाची पथके रवाना करण्यात आली आहेत. विश्वजित जाधव असे या व्यावसायिकाचे नाव आहे. 

मांडवी खुर्द येथील शेट्टी फार्म हाऊसमध्ये Marathi Live News बिबट्याची शिकार करून अवयव लपवून ठेवले असल्याची तक्रार प्रसिद्ध हॉटेलचालकाच्या मुलीने वन विभागाकडे केली होती. त्यानुसार पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते. 

सहायक वनसंरक्षक दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भांबुर्डा वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, डोणजे वनपरिमंडळ अधिकारी सचिन सकपाळ यांच्या पथकाने विश्वजित जाधव यांच्या फार्म हाऊसवर छापा टाकला. फार्म हाऊसची  तपासणी करण्यात आली असता, कपाटात बिबट्याच्या नख्यांंसह पंजा आढळला. सराईत शिकाऱ्याने बिबट्याला ठार मारले असावे. असे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...