Wednesday, August 30, 2023

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आढळले गंधक Marathi Live News

Marathi Live News
बंगळूर : वृत्तसंस्था  : 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील Marathi Live News तापमानाबाबत धक्कादायक नोंदी करणाऱ्या चांद्रयानाच्या रोव्हरणे केलेल्या चाचण्यांत तेथे गंधक  मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याचे समोर आणले आहे. चंद्राच्या भूमीवर पाय ठेवल्यापासून सहा दिवसांत रोव्हरणे महत्त्वाची माहिती पाठवली असून वैज्ञानिक त्याचा अभ्यास करीत आहेत. 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक Marathi Live News उतरलेल्या विक्रम लँँडरमधील रोव्हरणे आपले काम सुरु केले आहे. त्याच्या हातात सूर्यप्रकाशाचे अवघे १४ दिवस असल्यान्रे त्याच्या कामाचा वेग वाढला आहे. तीन दिवसांपूर्वी पृष्ठभागावर तापमानाबाबत नोंदी पाठवत चंद्राच्या पृष्ठभागावर उणे १० अंश ते ६० अंश तापमान असल्याची महत्त्वाची माहिती पाठवली होती. त्याचे विश्लेषण करण्यात शास्त्रज्ञ गुंतले असताना आता नवीन माहिती समोर आली आहे. 

रोव्हरवर बसवलेल्या लेझरयुक्त स्पेक्ट्रोमीटरचा वापर करून चंद्रावर कोणते रासायनिक घटक आहेत याचा शोध घेतला आहे. त्यात चंद्रावर गंधक उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर लेझर किरणांच्या मदतीने हा अभ्यास करण्यात येत आहे. अपेक्षेनुसार चंद्रावर अॅॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटानियम, सिलिकॉन, मँँगेनीज आणि ऑक्सिजन असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. हायड्रोजनचा शोध सुरु आहे. असे इस्त्रोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...