- पाणीटंचाईवर तालुकानिहाय आपत्ती आराखडा तयार केला जाणार.
या बैठकीत मंत्री संदीपान भुमरे, जालना व बीडचे पालकमंत्री अतुल सावे, व्हीसीव्दारे परभणीचे पालकमंत्री तानाजी सावंत, लातूर व नांदेडचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासह विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्यासह सर्व जिल्ह्याधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
![]() |
| Marathi Live News |
मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे सर्व पालकमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली असून मोठे प्रकल्प, मध्यम आणि लघु प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मराठवाड्यातील पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे तालुकानिहाय प्रशासनाने आपत्तीचा Marathi Live News प्लॅन तयार करावा. यासाठी आवश्यकता वाटल्यास ममी दर आठवड्याला बैठक घेईन. पुढच्या आठवड्यातही याबाबत आणखी आढावा घेतला जाणार आहे, असे कृषिमंत्री मुंडे म्हणाले.
शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून चार पिकांचे बियाणे मोफत
मराठवाड्यात बँकाकडून शेतकऱ्यांना थकीत कर्जासाठी नोटीसा पाठवल्या जात आहेत. या नोटीस पाठवू नयेत. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या कर्जाचे पुनर्गठन करण्यासंदर्भातला प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. यामध्ये करडईसह इतर चार पिके लागवडीसाठी कृषी विभाग वेगळा ड्राइव्ह घेणार आहे. त्यांना लागणारे बियाणे मोफत दिले जाईल. त्यासाठी कृषी विभागाकडून आर्थिक तरतूद तसेच जास्तीचा निधी लागल्यास मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मांडला जाईल. पशुधनासाठी चार लागवडीचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
मंडळ वव गावांत जाऊन पाहणी करा
मुंडे म्हणाले की, २१ दिवसांचा पावसाचा सलग खंड पडला आहे. मात्र ज्या मंडळात पर्जन्यमापक यंत्रे बसवली, तेथे दोन मिमी पाऊस पडल्यास खंड ग्राह्य धरला जात नाही. पण इतर गावांत पाऊस नसल्यास या पाद्ध्तीचा फटका इतर गावांना बसत आहे. त्यामुळे मंडळनिहाय जाऊन आजूबाजूच्या गावांत पाहणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
.jpg)
No comments:
Post a Comment