पुढारी ऑनलाईन डेस्क : 
Marathi Live News
आंध्र प्रदेशाच्या गुन्हे Marathi Live News अन्वेषण विभागाने (CID) TDP प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक केली. एपी कौशल्य विकास महामंडळ घोटाळा प्रकरणी त्यांना अटक करण्यात आले आहे. नायडू यांच्यावर २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पोलिसांनी पूर्व गोदावरी जिल्ह्यातून नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांनाही ताब्यात घेतले आहे.
नंद्याल रेंजचे पोलिस डीआयजी Marathi Live News रघुरामी रेड्डी आणि गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या पथकाने नायडू यांच्या कॅम्प हॉलमध्ये शहरातील फंक्शन हॉलवर पहाटे ३ च्या सुमारास छापा टाकून त्यांना अटक केली. चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेदरम्यान टीडीपी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. समर्थक पोलिसांना नायडू यांच्या वाहनाजवळ येण्यापासून रोखत होते.
मात्र सकाळी सहा वाजता पोलिसांनी नायडू यांना त्यांच्या गाडीतून बाहेर काढले आणि अटक केली. त्यांना एपी कौशल्य विकास महामंडळ घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली असल्याचे डीआयजी रेड्डी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment