Wednesday, September 13, 2023

आमदार अपात्रतेवर आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी Marathi Live News

Marathi Live News

मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

शिवसेना आमदारांच्या Marathi Live News अपात्रतेसंबंधी याचिकांवर गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणी सुरुवात होणार आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांच्या याचिकांवर सुनावणी घेण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

राज्यातील सत्तासंघर्षावरील निकालात सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला होता. त्यासाठी पुरेशा. योग्य कालावधीत निर्णय घेण्यासही बजावले होते. या निकालाच्या पाच महिन्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडे आता प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होत आहे. 

ठाकरे गटाची बैठक 

दरम्यान, विधिमंडळातील Marathi Live News सुनावणीपूर्वी सकाळी ११ वाजता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. त्यानंतर १२ वाजता ठाकरे गटाचे सर्व आमदार आणि वकील सुनावणीसाठी उपस्थित राहतील. अध्यक्षांनी आमदारांना वैयक्तिकरित्या म्हणणे मांडण्याबाबत विचारणा झाल्यावरच आमदार आपली भूमिका वैयक्तिकरित्यामांडतील. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...