छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श पतसंस्थेच्या खातेधार्कांचा मोर्चा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाला काढण्यात आला. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी Marathi Live News नाकारली होती. तरी देखील हा मोर्चा काढण्यात आला. तसेच मोर्चात सहभागी महिलांनी बॅरिकेट्स तोडून मंत्रिमंडळाची बैठक सुरु असलेल्या सभागृहाकडे कूच केली. या वेळी आंदोलक आणि पोल्कीसंत चांगलीच रेटारेटी झाली. इतकेच नाही तर पोलिसांनी आम्हाला लाठीने मारले असल्याचा आरोप मोर्चात सहभागी महिलांनी केला आहे.
आदर्श पतसंस्थेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. यात सत्ताधारी मंत्र्यांचाही हात असल्याने या प्रकरणात कारवाई होत नसल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यामुळे एकही मंत्री मोर्चेकारांना भात्न्यासाठी येण्यास तयार नसल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले. मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला सर्वसामान्य लोकांना भेटण्यासाठी वेळ नसल्याचा आरोपही इम्तियाज जलील यांनी या वेळी केला.
मोर्चेकरी आक्रमक
आदर्श पतसंस्थेच्या खातेधारकांच्या वतीने या मोर्चात परवानगी देण्यात यावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. तसेच काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. Marathi Live News मात्र, बैठक सुरु होताच, अनेक खातेधारक महिला मोर्चेकरी आक्रमक होत, मंत्रिमंडळाच्या बैठक सुरु असलेल्या सभागृहाकडे निघाल्या. या वेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली.
.jpg)
No comments:
Post a Comment