मान्सूनचा आस गुरुवारी सरासरी जागेपासून दक्षिणेला सरकला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरातील साडेसात किलोमीटर उंचीचे कमी दाबाचे क्षेत्र झारखंड राज्यासह सभोवताली तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात २६ सप्टेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामानतज्ञ माणिकराव खुले यांनी वर्तवली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर मराठवाडा आणि विदर्भात मध्यम पावसाचा अंदाज आहे.
देशातून नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास २६ सप्टेंबरपासून होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सप्टेंबरच्या शेवटापर्यंत उत्तर भारतातील बर्याच भागातून मान्सून परतण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. तर सप्टेंबरला संध्याकाळनंतर वादळी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागने दिली आहे. त्यामुळे Marathi Live News अनेक दिवसांपासून आस लावून बसलेल्या शेतकऱ्याला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
![]() |
| Marathi Live News |
पावसाची तुट कायम
राज्यात ५ ओक्टोंबर नंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी राज्यात Marathi Live News वादळी पावसाचा अंदाज तरी राज्यातील पाण्याची तुट भरून निघणे सध्यातरी अशक्यच दिसत आहे. यंदा राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात पेंरण्याही झाल्या नाही. अनेक ठिकाणी दुबार पेरणी झाल्यानंतरही हाती काहीच लागले नाही. अनेक धरणात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उपस्थित होत आहे. सरासरीचा विचार करता पावसाची अजूनही तुट कायम आहे ही तुट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुढील काळात दुष्काळी परिस्थितीत सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment