बंगळूर : पुढारी वृत्तसेवा 
Marathi Live News
कावेरीतून तामिळनाडूला पाणी Marathi Live News सोडण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज (दि.२९) कर्नाटक बंदची हाक देण्यात आली आहे. तामिळनाडूला पाणी सोडण्यास विरोध करत शेतकरी संघटनांंकडून मंगळवारी बंगळूर बंद ठेवण्यात आले होते.
त्यानंतर आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार शेतकरी संघटनांंनी केला आहे. यासाठी आज बंद Marathi Live News पुकारण्यात आला आहे. कावेरी पाणी नियंत्रण प्राधिकरणाने कावेरीतून तमिळनाडूला रोज ५ हजार क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. याविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यानंतर मंगळवारी कावेरी पाणी नियंत्रण समितीने २० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत रोज ३ हजार क्युसेक पाणी तमिळनाडूला सोज्ञाच्रे आदेश दिले आहेत.
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलने हाती घेण्यात आली आहेत. राज्यभरात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. परिणामी पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध नाही. अनेक धरणे कोरडी आहेत. यामुळे कावेरीतून पाणी सोडण्यास शेतकऱ्यातून विरोध करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment