कोल्हापूर शहर बंदच्या Marathi Live News पार्श्वभूमीवर श्रातील महापालिका कार्यक्षेत्रातील १८५ हून अधिक प्राथमिक शाळांना मंगळवारी (दि.५ ) सुट्टी राहणार आहे. तसे परिपत्रक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी मुख्याध्यापकांना काढले आहे. जालना येथील लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा संघटनांनी मंगळवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.
त्यामुळे विद्यार्थी वाहतूक Marathi Live News व्यवस्था बंद राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थी हिताचा विचार करून शहरातील सर्व प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षक दिनानिमित्त घेण्यात येणारे विविध कार्यक्रम व रक्तदान शिबीर रद्द करण्यात आले आहे.
शहरातील माध्यमिक शाळा मात्र सुरु राहणार आहेत. माध्यमिक शिक्षण संचालक व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शाळा बंद ठेवण्याचे आदेश नसल्याने सर्व माध्यमिक शाळा सुरु राहतील. असे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाशिकारी एकनाथ आंबोकर यांनी सांगितले.
.jpg)
No comments:
Post a Comment