Thursday, September 28, 2023

एकीकडे उत्साह, दुसरीकडे दुर्देवी घटना, विसर्जनासाठी मदत करणाऱ्या स्वयंसेवकाचा मृत्यू Marathi Live News

 

मुंबईत गणेश विसर्जनाचा उत्साह दिसून येत असताना दुसरीकडे एक दुर्देवी घटना घडली आहे. जुहू चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी प्रशासनाच्या मदतीसाठी असलेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू Marathi Live News झाला आहे. मुंबईत दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्याचवेळी १६ वर्षीय स्वयंसेवक हसन शेख यांच्यावर वीज कोसळली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

मुंबईत गणेश विसर्जनासाठी जुहू चौपाटीवर मोठी गर्दी उसळते. त्या अनुषंगाने या ठिकाणी मुंबई महापालिका आणि इतर यंत्रणांकडून गणेश भक्तांच्या गर्दीचे नियोजन करणे, विसर्जनासाठी मदत करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी स्वयंसेवकदेखील उपस्थित आहेत. दुपारच्या सुमारास मुंबईत वीजांच्या कडकडाट झाला होता. त्याच दरम्यान वीज कोसळली होती. यात १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे. 

मुंबईत सर्वत्र गणेश विसर्जन सुरु असताना मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावरून ही धक्कादायक घटना पुढे आली आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या १६ वर्षीय मुलाचे नाव हसन युसुफ शेख असे आहे. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एकजण समुद्रात बुडत असल्याचे दिसले. त्याच क्षणी जीवरक्षकांनी Marathi Live News समुद्रात उडी घेत त्याला पाण्याबाहेर काढले. जखमी अवस्थेत असलेल्या या युवकाला उपचारासाठी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. 


No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...