![]() |
| Marathi Live News |
नवी दिल्ली, वृत्तसंस्था :
भारताने कॅनडाला Marathi Live News आपल्या (कॅनडाच्या) दिल्लीतील दूतावासातील ४१ अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा आरोप कॅनडाने भारतावर केल्याने तसेच खलिस्तानी दहशतवादाला कॅनडा आपल्या भिमित खतपाणी घालत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत सोडण्यासाठी Marathi Live News अधिकाऱ्यांना १० ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अंतिम मुदतीनंतरही भारत सोडला नाही. तर अशा अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सवलती आणि इतर फायदे बंद केले जातील. कॅनडाचे सुमारे ६२ मुत्सद्दी भारतात सध्या आहेत. १० ऑक्टोबरनंतर केवळ २१ मुत्सद्दीदेशात राहतील.
याआधीही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही देशांत परस्परांकडील राजनयिकांची संख्या समान करण्यास सांगितले होते. व्हीएना करारानुसार तसे आवश्यकही आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुुडो यांनी निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर एका भारतीय मुत्सद्यालाही देशाबाहेर काढले होते. कॅनडाच्या या कारवाईला प्रत्युत्तर देताना भारतानेही कॅनडाच्या एका राजनयिकाला देश सोडण्यास सांगितले होते. नंतर भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवाही बंद केली.
.jpg)
No comments:
Post a Comment