पणजी ; पुढारी वृत्तसेवा : .jpg)
Marathi Live News
हमास इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील इस्त्रायली संस्थांना सुरक्षा पुरवण्यात येत आहे. त्यात गोव्यातील छ्बाड हाऊसचाही समावेश आहे. यहुदींची प्रार्थनास्थळे Marathi Live News असलेल्या गोव्यातील छ्बाड हाऊसना आवश्यक सुरक्षा देण्यात आल्याची माहिती गोवा पोलीस मुख्यालयातून देण्यात आली आहे.
गोव्यात एकूण Marathi Live News यहुदींची ३ प्रार्थनास्थळे, म्हणजे छाबड हाउस आहेत. त्यातील हणजुणे व मोरजी येथे प्रत्येकी एक तर काणकोणमधील पाळोळे किनारा भागात एक आहे. हणजुणे व मोरजी येथील छाबड हाउस सध्या बंद आहे. परंतु काणकोणमध्ये चालू आहे. या छाबड हाउसमध्ये शनिवार व रविवार असे दोन दिवस प्रार्थना होत असते. त्यामुळे या छ्बाड हाऊसला अधिक सुरक्षा पुरवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पर्यटन हंगामात सरासरी २ हजार ते २४०० इस्त्रायली नागरिक गोव्यात येतात. यातील काहीजण दीर्घ पर्यटक व्हिसा घेऊन येतात. सध्या गोव्यात पर्यटन हंगाम सुरु झाला नसल्यामुळे सध्यातरी गोव्यात इस्त्रायली नागरिक क्वचित असावेत असे पोलिसांनी सांगितले.
No comments:
Post a Comment