![]() |
| Marathi Live News |
एकतर्फी प्रेमातून सदाशिव पेठेत पेरूगेट Marathi Live News पोलीस चौकीजवळ सकाळच्या वेळी तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी जामीन मंजूर केला. शंतनू लक्ष्मण जाधव (व्य २१, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.
जाधव याने २७ जून २०२३ रोजी सदाशिव पेठेत सकाळी दहाच्या सुमारास तरुणीवर कोयत्याने वार केले होते. त्या वेळी काही तरुणांनी आरोपी जाधवला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पीडित २० वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून जाधवच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून जाधव कोठडीत होता. जाधवने अॅड.अभिषेक हरगणे, अॅड. स्वप्नील चव्हाण, अॅड. ओंकार फडतरे यांच्यामार्फत जामीन मिळवण्यासाठी अर्ज सादर केला होता. कारागृहात जामीन मिळवून बाहेर पडल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी बोलाविल्यानंतर उपस्थित राहणे, पासपोर्ट जमा करणे या अटींवर जाधव याचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला.
दरम्यान, सदाशिव पेठेत झालेल्या या हल्ल्याची राज्यभरात मोठी चर्चा झाली होती. हल्लेखोर हा तरुणीच्या Marathi Live News मागे धावत असताना तेथे उपस्थित असलेल्या तरुणांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. तसच तरुणीचा जीव वाचवणाऱ्या या तरुणांवर नंतर अनेक राजकीय नेत्यांसह सामाजिक संस्थांनी बक्षिसांचा वर्षाव केला होता.

No comments:
Post a Comment