![]() |
| Marathi Live News |
किडनीच्या आजाराशी संबंधित रुग्णावर उपचारासाठी युरीमॅक्स डी औषधी वापरण्यात येते. हे औषधी सिप्ला कंपनी तयार करते, परंतु कंपनीच्या नावाने बनावट औषधी विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषधी विभागाने बन्सीलालनगरातील श्रीराम कॉम्प्लेक्समध्ये छापा मारूनMarathi Live Newsबनावट औषधी जप्त केली. या प्रकरणी डी. के. फार्मा कंपनीचे मालक, औषधीचा पुरवठा करणाऱ्या बिहारच्या कंपनी विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने औषध निरीक्षक बळीराम दामोदर मेरवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात बनावट औषधी विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषधी विभागाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना मिळाली होती. बन्सीलालनगरातील श्रीराम कॉम्प्लेक्स येथील डिके फार्मा या कंपनीतून या मालाचा पुरवठा केला जात होता.
बीड येथील टॉप मेडिकल येथे औषधी १८ जानेवारी रोजी विक्री केल्याचे समजले. अन्न व औषधी निरीक्षकMarathi Live Newsबळीराम दामोदर मेरवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी डी. के. फार्मा कंपनीतून शहरात व जिल्ह्यात विविध ठिकाणाहून युरीमॅक्स डी टॅॅबलेटची तपासणी केली. तेव्हा ही औषधी बनावट असल्याची माहिती समोर आली. या वेळी युरीमॅक्स औषधींच्या २४ स्ट्रिप्स ताब्यात घेतल्या. मधुबाला सुरेश चोरडिया, डी. के. फार्माचे संजय गर्ग, विनीत कुमार, मे. मार्स फार्माचे पुनिया, लाईन बाजार बिहार व इतरांवर वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे करत आहेत.
ऑर्डर दिल्लीची, मालपुरवठा बिहारचा
मधुबाला चोरडिया व लव्ही सुरेश चोरडिया यांनी दिल्लीच्या संजय गर्ग यांच्याकडून युरीमॅक्स औषधींची ऑर्डर दिली होती. दिल्लीला ऑर्डर प्लेस झाल्यानंतर बिहार येथील मार्स फार्म पुनिया येथून मालाचा पुरवठा करण्यात आला.

No comments:
Post a Comment