Wednesday, October 18, 2023

१९ महिला-मुलांची हत्या अन मृतदेहांवर बलात्कार ; १४ वर्षापासून शिक्षा भोगणाऱ्या आरोपींची सुटका Marathi Live News

 अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी ( १६ ओक्टोंबर २०२३) नोएडाच्या बहुचर्चित निठारी प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेंद्र कोली याची निर्दोष मुक्तता केली. यासोबतच सह आरोपी मोनिंदर सिंग पंढरे यालाही उच्च न्यायालयाने दोन खटल्यात दोषमुक्त केले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे दोघांनाही फाशीची शिक्षा देण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. 

सुरेंद्र कोली आणि मोनिंदर सिंग पंढरे, Marathi Live News यांना ट्रायल कोर्टाने खून आणि बलात्काराच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. गाझियाबाद सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला पंढरे आणि कोलीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. निकाल देताना खंडपीठाने म्हटले की, फिर्यादी पक्ष आरोपिंविरीधात आरोप सिद्ध करण्यात अयशस्वी ठरला. जाणून घ्या काय आहे प्रकरण..

Marathi Live News

मृतदेहांवर बलात्कार :- या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपी कोलीची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्यात आली. चाचणीदरम्यान त्याने सांगितले की, सर्व मृत्यू गळा दाब्ल्यामुलेझाले. तसेच, तो मृतदेहांवर बलात्कार आणि नंतर त्याचे तुकडे करायचे. 

मानवी मांस खाल्ले निठरीचे हे खळबळजनक प्रकरण तेव्हा उघडकीस आले, जेव्हा २९ डिसेंबर २०६६ रोजी Marathi Live News नोएडातील निठारी येथे पंढरे याच्या घरामागील नाल्यात आठ मुलांचे सांगाडे सापडले होते. अनेक मिडिया रिपोर्टनुसार, सुरेंद्र कोलीवर मृतांच्या शरीराचे अवयव खाल्ल्याचा आरोपही आहे. 
१९ महिला आणि मुलांवर बलात्कार आणि हत्या मोनिंदर सिंग पंढरे याच्या घरातून सापडलेल्या मानवी अवशेषांच्या आधारे दोन्ही आरोपिंविरुध्द वेगवेगळ्या कलमांखाली अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. कोली आणि पंढरे यांच्यावर १९ महिला आणि मुलांवर बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप आहे. १३ फेब्रुवारी २००९ रोजी दोन्ही आरोपींना विशेष सीबीआय न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. 



























No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...