![]() |
| Marathi Live News |
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
परिवहन मंत्री नितीन गडकरी Marathi Live News यांनीही शरद पवार यांचे वक्तव्य बेजबाबदार आणि निषेधार्ह असल्याची तोफ डागली आहे.
मंत्री गडकरी यांनी सोशल मिडिया एक्सवर म्हटले कि शरद पवार यांनी केलेल्या बेजबाबदार विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलमधील नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सातत्याने सर्व प्रकारच्या Marathi Live News दहशतवादाच्या विरोधात उभा राहिला आहे. इस्त्रायलमधील दहशदवादी हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी केलेला तीव्र निषेध हे जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठीच्या आपल्या अटल वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.
राष्ट्रहित आणि राष्ट्रीय सुरक्षेला राजकीय विचारांनी कधीही बाधा आणता कामा नये हे शरद पवारांसारख्या जेष्ठ राजकीय नेत्यांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे. असा खोचक सल्ला देताना गडकरी यांनी म्हंटले, कि राष्ट्रीय सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे आणि सहमती असली पाहिजे. परिस्थितीच्या गंभीरतेमुळे राजकीय संबंध किंवा वैयक्तिक मतांची पर्वा ण करता दहशतवादाविरूद्ध एकसंध राहणे आवश्यक आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment