![]() |
| Marathi Live News |
कोपरगाव (जि. अहमदनगर) : मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीत, तोपर्यंत राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय तालुक्यातील करंजी येथील मराठा Marathi Live News समाजाच्या वतीने शुक्रवारी घेण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी गावातील सामाजिक सभागृहाजवळ तरुणांनी ठाण मांडून नेत्यांना गावात येऊ न देण्याचा निर्धार केला.
जरांगे पाटील मित्र मंडळ व करंजी येथील मराठा समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तशा आशयाचा मजकूर व्हॉटसअॅप व फेसबुकवर व्हायरल करण्यात आला. Marathi Live News शनिवारी सकाळीच कारंजी येथील सामाजिक सभागृहाजवळ गावातील मराठा समाजाचे तरुण एकत्र आले. त्यांनी मंडप टाकून गावात कोणताही नेता येऊ नये, यासाठी ठाण मांडले.
कोपरगाव येथील सकल मराठा समाजाचे अनिल गायकवाड अॅड. योगेश खालकर, विनय भागत करंजी गावात गेले. त्यांनी गाव बंदीचा निर्णयाचे स्वागत केले.

No comments:
Post a Comment