इस्लामाबाद वृत्तसंस्था :
पाकिस्तानच्या अण्वस्त्र Marathi Live News केंद्राजवळ शुक्रवारी महाभयंकर स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता कि, ३० किमीपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला.
विविध पाकिस्तानी माध्यमांत अत्यंत त्रोटक माहिती उपलब्ध होत असून स्फोटानंतरचे काही व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात डेरा गाझी खान येथे पक्कीस्तानी लष्कराचा अण्वस्त्रांचा साठ असलेले केंद्र आहे.
याला अनुआयोगाचा Marathi Live News परिसर म्हणून ओळखला जाते. त्याच डेरा गाझी खान येथे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येते. हा स्फोट अण्वस्त्र साठ असलेल्या केंद्रात झाला कि बाहेर याबाबतही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हा स्फोट एवढा भयंकर होता कि, त्याचा आवाज ३० किमीच्या परिघात ऐकू आला. व्हिडीओत स्फोटानंतरची पळापळ व वेगाने धावणाऱ्या अॅॅम्ब्यूलन्स व अग्निशमन दलाच्या गाड्या दिसतात. या स्फोटांत जीवितहानी झाली कि नाही. याबाबतहि अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
.jpg)
No comments:
Post a Comment