![]() |
| Marathi Live News |
सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर गुरुवारी चार दिवसानंतर बीड शहर पूर्वपदावर आले. इंटरनेटअभावी बँक, जीएसटीसह काही कार्यालयांची कामे खोळंबली असली तरी प्रमुख बाजारपेठ, शाळा पूर्ण क्षमतेने सुरु झाल्या आहेत. शाळांमध्ये प्रथम सत्राच्या परीक्षा पुन्हा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, पाचव्या दिवशीही बीड Marathi Live News जिल्ह्यात बससेवा ठप्प होती. शुक्रवारी किमान जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु व्हावी, असे प्रयत्न एसटी महामंडळाकडून केले जात आहेत.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बीड शहरात शनिवारपासूनच हिंसक वळण मिळाले होते. सोमवारी दुपारी या आंदोलनाने उग्र स्वरूप धरण केले. मोठ्या प्रमाणावर जाळपोळ, तोडफोड झाली. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे सोमवारी रात्रीपासूनच जिल्ह्याधिकारी दीपा मुधोळ यांनी जिल्ह्यात संचारबंदी उठवण्यात आली. मात्र जमावबंदी कायम ठेवली गेली.
इंटरनेट बंद असल्याने बुधवारी सकाळी संचारबंदी शिथिल झाल्याची माहिती शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी यांना नव्हती. त्यामुळे शाळा, महाविद्यालय बुधवारी सुरु झालेले नव्हते. शिवाय, अफवाही पसरत असल्याने बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरु झालेली नव्हती. गुरुवारी मात्र चार दिवसानंतर बीड शहर पूर्वपदावर आले. Marathi Live News जनजीवन सुरळीत झाले. सुभाष रोड, मोंढा ही प्रमुख बाजारपेठ सुरु झाली होती. व्यवहार सुरळीत होते. केवळ इंटरनेटवर अवलंबून असलेली कामे खोळंबली होती. शाळांमध्येही मुलांनी गर्दी केली होती. प्रथम सत्राच्या परीक्षा पुन्हा सुरु झाल्या होत्या, तर पाच दिवसांपासून बंद असलेली एसटीची बससेवा आज शुक्रवारी किमान जिल्ह्यांतर्गत सुरु व्हावी यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरु आहेत.

No comments:
Post a Comment