Friday, November 24, 2023

तरेळे - गगनबावडा मार्गावरील खड्डे पावसाळी डांबराने भरण्याचे काम सुरु..! Marathi Live News

Marathi Live News

 
वैभववाडी :- आमदार नितेश राणे यांच्या दणक्यानानात्र राष्ट्रीय महाम्र्ग प्राधिकरण विभागाने तरळे - गगनबावडा मार्गावर खड्डे भरण्याचे काम सुरु केले आहे. पावसाळी डांबरानेच Marathi Live News खड्डे भरण्याचे काम पूर्ण केले जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात  येत आहे. डागड्डज्जीचे काम सुरु झाल्याने प्रवासी व वाहन चालकांत समाधान व्यक्त होत आहे. 

तरेळे - गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरश : चाळण झाली आहे. नाधवडे, कोकिसरे करूळ गावानजीक मार्गावरून चालणे ही अवघड झाले आहे. तर करूळ घाट अक्षरशा खड्ड्यात गेला आहे. Marathi Live News या पाश्र्वभूमीवर शनिवारी आमदार नितेश राणे यांनी या रस्त्याची व घाटाची पाहणी केली. महामार्गाचे अधिकारी अतुल शिवनीवर यांना त्यांनी धारेवर धरत खडे बोलू सुनावले होते. आमदार नितेश राणे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अधिकाऱ्यांनी मार्गावरील खड्डे पावसाळी डांबराणे त्वरित भरले जातील व गटर सफाईची कामे केली जातील असे कबूल केले होते. 

सोमवार पासून नाधवडे येथील खड्डे भरण्याचे काम सुरु झाले आहे. तर कोकिसरे, करूळ व करूळ घाटातील ही खड्डे भरण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने या महामार्गासाठी जवळपास २५० कोटी मंजूर झाले आहेत. हे काम देखील काही महिन्यात सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी खड्डे भरण्यात येत असल्याने गावातील ग्रामस्थ, वाहन चालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. 




























No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...