![]() |
| Marathi Live News |
पवार कुटुंबियांची दिवाळी यंदा बारामती ऐवजी पुण्यात साजरी करण्यात आली. शरद पवार यांचे भाऊ प्रतापराव पवार यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय जमले Marathi Live News होते. यानिमित्तानं अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली. या भेटीनंतर चर्चा रंगलेय ती अजित पवर यांनी केलेल्या एका विधानाची.
राष्ट्रवादीत सध्या राजकीय उलथापालथीना वेग आलाय. डेंग्यूमुळे अनेक दिवस घराबाहेर न पडलेले अजित पवार शुक्रवारी अचानक शरद पवारांना भेटले.
काका पुतण्या एक होणार ?
अजित पवार दिल्लीला जाण्यापूर्वी आज दुपारी पुण्यात पवार कुटुंब एकत्र आलं. पुण्यात प्रतापराव पवारांच्या घरी पवार कुटुंबीयांची दिवाळी साजरी करण्यात आली. शरद पवार, Marathi Live News अजित पवार, सुप्रिया सुळे दिवाळीसाठी एकत्र आले होते. सध्याच्या राजकीय पेचातून मार्ग काढण्यासाठी काका-पुतणे पुन्हा एक होणार का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झालीय.
पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी संध्याकाळी थेट दिल्ली गाठली
काका-पुतण्याच्या या भेटीमुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी संध्याकाळी थेट राजधानी दिल्ली गाठली. विमानतळावरून ते थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या घरी गेले. तिथं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत त्यांनी अमित शाहांची भेट घेतली.

No comments:
Post a Comment