मुंबई पुढारी वृत्तसेवा : 
Marathi Live News
मुंबई विमानतळावरून दिवाळी Marathi Live News सणामध्ये प्रवासी संख्येसोबतच तब्बल दोन हजार ५० मेट्रिक टन कार्गोची (माल) वाहतूक झाली आहे. देशांतर्गत दिल्ली आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर लंडनला सर्वाधिक माल वाहतूक झाली आहे
दिवाळीचा आनंद साजरा करताना नातेवाईक-मित्रमैत्रिणींना जलद भेटवस्तू पाठविण्यासाठी विमानाच्या कार्गोचा वापर केला जातो. मुंबई विमानतळावरून यंदाच्या दिवाळीत झालेल्या मालवाहतुकीत इ-कॉमर्स क्षेत्राचा मोठा वाटा आहे आउटबाउंड देशांतर्गत मालामध्ये लक्षणीय ६४ टक्के तर इनबाउंड Marathi Live News देशांतर्गत कार्गोमध्ये ३६ टक्के वाहतूक झाली आहे. ऑनलाईन खरेदीच्या वाढत्या क्रेझमुळे विमान कार्गोची मागणी वाढली आहे.
विमान कार्गोचा विचार करता देशांतर्गत वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. जवळजवळ ५६ टक्के वाहतूक देशांत तर ४४ टक्के वाहतूक अंतरराष्ट्रीय मार्गावर झाली आहे. आंतर राष्ट्रीय मार्गावर लंडन तर देशांतर्गत दिल्लीला सर्वाधिक मालवाहतूक झाली आहे. त्यानंतर हैदराबाद आणि बंगळूर शहरांमध्ये वाहतूक झाली आहे. देशांतर्गत क्षेत्रातील अग्रगण्य इंडिगो आणि क्विकजेट एअरलाइन्स या दोन्ही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात ,मालवाहतूक केली. दरम्यान दिवाळीच्या काळात मालवाहतूक प्रकिया सुरळीत आणि वेळेवर व्हावी यासाठी मुंबई विमानतळाने धोरणात्मक उपाययोजना राबवल्या होत्या.
No comments:
Post a Comment