![]() |
| Marathi Live News |
विश्वचषक सामन्याचा Marathi Live News उपांत्यफेरीत दमदार विजय मिळवत भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे आज या सामन्यात मोहम्मद शमीने सात विकेट घेत मोठी कामगिरी बजावली आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडीयमवर बिध्वरी (१५ नोव्हेंबर) खेळल्या गेलेल्या उपांत्य दरीत न्युझीलंडचा ७० धावांनी पराभव करत भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी टीम इंडिया १९८३, २००३ आणि २०११ मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. या सामन्या दरम्यान टीम इंडियाच्या मोहम्मद शमीने सर्वाधिक ७ बळी मिळवले. तर जसप्रित बुमराह आणि कुलदीप यादवला १-१ विकेट मिळाली.
विश्वचषक सामन्यांमधील शमीच्या विकेटचे अर्धशतक पूर्ण
भारताचा वेगवान गोलंदाज Marathi Live News मोहम्मद शमीने विश्वचषकाच्या आजच्या सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडीयमवर बुधवारी (१५ नोव्हेंबर ) न्युझीलंडविरुध्दच्या उपांत्य फेरीत त्याने जबरदस्त गोलंदाजी करत एकूण सात बळी घेतले. त्याने त्याच्या संपूर्ण कार्यकाळात विश्वचषकात एकूण ५४ बळी घेतले आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे इतक्या विकेट घेणारा शमी हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला हे. तसेच शमीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रमही मोडला.
विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
ग्लेन मॅॅकग्राथ ( ऑस्ट्रेलिया) - ७१
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका ) - ६८
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) - ५९
लसिथ मलिंगा (श्रीलंका ) - ५६
वसीम अक्रम (पाकिस्तान ) - ५५
मोहम्मद शमी ( भारत ) - ५४
ट्रेंंट बोल्ट (न्युझीलंड ) - ५३

No comments:
Post a Comment