Thursday, November 16, 2023

तू लढला नाही गेलास तरी चालेल परंतु तू विकला जाऊ नकोस....ठाकरे गटाकडून शिंदे गटावर बॅनरच्या माध्यमातून खोचक टीका Marathi Live News



Marathi Live News

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर रोजी स्मृती दिन आहे. या पाश्वर्भूमीवर शिवसेनेतील दोन्ही गटाचा वाद पुन्हा उफळून आला. मुंबईत गुरुवारी झालेला हा वादMarathi Live Newsशुक्रवारी ठाण्यात दिसून आला. बॅॅनरच्या माध्यमातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटाला लक्ष केले आहे. 

गणेश थोरात, ठाणे | १७ नोव्हेंबर २०२३ : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला दोन शिवसेनेतील वाद उफळून आला. दोन गटाचे शिवसैनिक गुरुवारी रात्री एकमेकांच्या विरोधात भिडले. एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करत धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे स्मृती स्थळाजवळ लावलेले रॉड पडले, बॅॅरिकेडसही पडले. गुरुवारच्या या वादानंतर आता ठाणे बॅॅनरबाजीमधून वादMarathi Live Newsनिर्माण केला जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिंदे आणि ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅॅनरबाजी करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला बॅॅनरच्या माध्यमातून खोचक टोला लागला आहे. 

ठाकरे गटाने केले शिंदे गटाला टार्गेट 

१७ नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅॅनरबाजी करण्यात आली आहे. ठाण्यातील तीन हात नाका परिसरात शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी बॅॅनर लावले. दुसरीकडे ठाकरे गटाकडून देखील बॅॅनर लावले गेले आहे. त्या बॅॅनरच्या माध्यमातून शिंदे गटाला टार्गेट केले गेले आहे. 

काय म्हंटले आहे बॅॅनरमध्ये 

तू लढला नाहीस तरी चालेल परंतु तू विकला जाऊ नकोस तू विकला गेलास तर समाज कमजोर होईल , असा आशय असलेला मजकूर लिहिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खोचक टोला लगवणारा हा मजकूर बॅॅनरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईतून सुरु झालेला हा वाद ठाण्यात पोहचणार आहे. आता ठाण्यात येणाऱ्या काळात शिंदे आणि ठाकरे गट हा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे. दोन्ही गटातील वाद लक्षात घेऊन ठाण्यात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठाण्यात दोन्ही गटाकडून देखील मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. आता ठाण्यात पोलिसांची कसोटी लागणार आहे.   


No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...