Saturday, November 25, 2023

निवडणुकीच्या तोंडावर तेलंगणात ५ कोटींची रोकड जप्त Marathi Live News

Marathi Live News

रंगारेड्डी, वृत्तसंस्था : 

तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला Marathi Live News विधानसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत पोलिसांनी रंगारेड्डी येथील गचीबोवलीत एका कारमधून ५ कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. कार चालक या रकमेचा काहीही हिशेब देऊ शकलेला नाही. पोलिसांनी रकमेसह कारमधील याप्रकरणी ७ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार वाहन तपासणीत एका कारमध्ये दोन सुटकेस होत्या. त्या उघडल्या असता हो रोकड आढळली. ही रोकड आयकर विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. 

आजअखेर निवडणूक Marathi Live News असलेल्या ५ राज्यांमध्ये मिळून १ हजार ७६० कोटी रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. २०१८ मध्ये या ५ राज्यांमधून मिळालेल्या रोख रकमेपेक्षा हे प्रमाण ७ पट अधिक आहे. 

उधळपट्टी दिवसेंदिवस वाढती 

यापूर्वी निवडणूक आयोगाने गुजरात, हिमाचल, नागालँँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये १४०० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली होती. हि रक्कम या राज्यांत याआधी झालेल्या निवडणुकीत जप्त करण्यात आलेल्या रकमेच्या ११ पट अधिक आहे. याचाच अर्थ असा, कि निवडणुकांत पैशांची उधळपट्टी दिवसेंदिवस वाढती अशी आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...