![]() |
| Marathi Live News |
तालुक्यात रविवारी (दि. २६) वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने महावितरणाच्या पिंपळास रामाचे व जळगाव येथील ३३ केव्ही सबरस्टेशनला वीजपुरवठा करणारे व सबस्टेशनपासून नऊ गावांना वीजपुरवठा करणारे एकूण १२२ पोल पडल्याने Marathi Live News ही गावे तीन दिवस अंधारात होती. मात्र, महावितरणाच्या अधिकाऱ्यांसह १०० कर्मचाऱ्यांनी कठोर मेहनत घेत मंगळवारी (दि. २८) गावांचा वीजपुरवठा सुरळीत केला. मात्र, अद्यापही शिवारातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. तीन दिवस या गावांतील पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्याने गावांत टंचाई निर्माण झाली होती.
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने वीज सुरळीत
वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब पडल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. रविवारी रात्रीच पिंपळस Marathi Live News सबस्टेशन येथे अधिकाऱ्यांची तातडीची मिटिंग घेऊन करायच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास दुरुस्तीचे काम हाती घेतले व संपूर्ण दिवसभर व रात्रभर काम करून वीजपुरवठा सुरळीत केला.

No comments:
Post a Comment