Wednesday, November 22, 2023

सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक भगवान जाधव यांचे निधन. ! Marathi Live News

Marathi Live News
 


सावंतवाडी :- तालुक्यातील चौकुळ येथील रहिवाशी तथा सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे संचालक भगवान जाधव यांचे आज बुधवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. Marathi Live News उद्योजक तथा प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी आपल्या शेतीत केला. मात्र, मागील काही वर्षे मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते. 

काल सायंकाळी श्वसनाच्या त्रास जाणवू लागल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी गोवा जीएमसी येथे हलविण्यास Marathi Live News कळविले. मात्र गोवा जीएमसी येथे पोहोचण्यापूर्वी. श्री. जाधव यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पच्शात पत्नी, मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्ञानसेवा अकादमीचे संचालक अभय जाधव व अव्दिक बिझनेसचे मालक संजोग जाधव यांचे वडील होते. 





















































No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...