Thursday, November 23, 2023

बांद्यात उद्या श्री विठोबाची जत्रा..! ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. Marathi Live News

Marathi Live News
 

बांदा :- बांदा येथील प्रसिध्द श्री विठ्ठल मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिकी एकादशीला गुरुवार डी. २३ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच Marathi Live News वाजता काकडआरतीने हा सोहळा आरंभ होईल. 

त्यानंतर दर्शनास सुरुवात होईल. सायंकाळी उत्सवमूर्तीचे मंदिरात आगमन होईल. सायं ५ ते ७ श्री विठ्ठल सोहीरा महिला भजन मंडळाची भजनसेवा होईल. ७ वाजता नित्य सायं आरती होईल. रात्रो ठीक ९ वाजता श्रींचा पालखी सोहळा आरंभ होईल. या जत्रोत्सवानिमित्त रात्रो आजगांवकर दशावतार मंडळाच्या नाट्यप्रयोगाचे Marathi Live News आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल मंदिर, बांदा देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.  


























No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...