![]() |
| Marathi Live News |
जुनी पेन्शन योजना सर्वाना लागू करा, अशी प्रधान मागणी व इतर १४ प्रलंबित मागण्यांसाठी १४ मार्च २०२३ पासून २० मार्च २०२३ पर्यंत कामचारी-शिक्षकांनी संप केला. Marathi Live News राज्याच्या मुख्यमंत्री यांचा मान ठेवून कर्मचारी शिक्षकांच्या सुकाणू समितीने बेमुदत सुरु केलेला हा संप स्थगित केला. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला सहा महिने उलटून गेले.
जुनी पेन्शनसाठी नेमलेल्या अभ्यास समितीने तीन महिन्यांत अहवाल देणे अपेक्षित असताना मुदतवाढ घेऊनदेखील अद्याप शासनाकडून सदर समितीचा अहवाल जाहीर केला नाही. सरकारकडून कर्मचारी शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होत नाही. उलट शिक्षण, आरोग्य अशा मुलभूत सेवा देणे हे सरकारचे कर्तव्य असताना सरकार यावरील खरच कमी करून खासगीकरण व कंत्राटीकरण करू पाहात आहे.
गरीब, उपेक्षित, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणत कंत्राटी व रोजंदारी तत्त्वावर कर्मचारी कार्यरत असून त्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले जात नाही. संघटनेच्या या मागण्या केवळ आर्थिक स्वरूपाच्या नसून त्या सामाजिक गरज म्हणून मांडण्यास आल्या आहेत, असे संघटनेचे म्हणणे आहे.

No comments:
Post a Comment