![]() |
| Marathi Live News |
रेल्वे प्रवाशांना दिली जाणारी भाडे सवलत यापुढे मिळणार नाही. अनेक संघटना आणि समित्यांच्या मागण्यांवर विचार केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. काही अपवाद Marathi Live News वगळता प्रवाशांना आता सरसकट ही सुत मिळणार नाही.
रेल्वेचे म्हणणे आहे की भाडे अनुदान पूर्वीप्रमाणेच सुरु असून त्यात आणखी सुत देणे शक्य नाही. म्हणजेच २०२० पूर्वी ज्येष्ठ नागरिकांसह इतर श्रेणींना दिलेली सवलत भविष्यातही बंद राहणार आहे. कोरोनापुर्वी विविध श्रेणीतील प्रवाशांना रेल्वे भाड्यात सूट देण्यात आली होती. २०२० मध्ये ती बंद करण्यात आली. त्यावर संसदीय समित्य, संस्था, संघटना आणि लोकप्रतिनिधीनी ही सूट पूर्ववत करण्याची शिफारस केली. गंभीर आजारांनी त्रस्त प्रवाशांसाठी भाडे सवलत सुरु ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. येत्या काळात सुविधा वाढवल्या जातील, Marathi Live News असा युक्तिवाद रेल्वेकडून केला जात आहे. वयोवृद्धांप्रमाणे महिलांनाही जास्तीच भाडे न देता प्राधान्याने लोअर बर्थ मिळतील.

No comments:
Post a Comment