Wednesday, November 22, 2023

प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 'एसटी' स्थानकावर 'आपला दवाखाना' ; ताफ्यात लवकरच ३४९५ नवीन गाड्वा Marathi Live News

Marathi Live News

मुंबई : राज्यातील प्रत्येक बस स्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल आणि  जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बस स्थानकावर 'आपला दवाखाना' सुरु करण्याचे निर्देशMarathi Live Newsमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी राज्य परिवहन महामंडळाला दिले. 

प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळाच्या ताफ्यात नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस दाखल होणार असून बस स्थानकांच्या स्वच्छतेला प्राधान्य देतानाच त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात ३४९५ नवीन गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. 

महामंडळाला २० नोव्हेंबरला एका दिवशी ३६.७३ कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल शिंदे यांनी अभिनंदन केले. राज्यातील सामान्य नागरिकांना एसटीच्या माध्यमातूनMarathi Live Newsगुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी २२०० साध्या बस घेण्यास मंजुरी दिली. या २२०० परिवर्तन साध्या बस मार्च २०२४ अखेल एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. या बरोबरच एसटीच्या २१ वेगवेगळ्या विभागासाठी १२९५ साध्या बस भाडेतत्वावर घेण्याच्या प्रस्तावास बैठकीत मान्यता देण्यात आली.  

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...