पुणे : पुढारी वृत्तसेवा .jpg)
Marathi Live News
राज्यातील दक्षिण कोकण, दक्षिण Marathi Live News मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह कमी दाबाच्या पावसाची शक्यता आहे. रविवारनंतर कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम कमी होऊन राज्यभरात हवामान कोरडे राहील. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र पूर्व-मध्य अरबी समुद्रावर आहे. मात्र या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे.
आग्नेय दिशेने येणाऱ्या Marathi Live News बाष्पयुक्त वाऱ्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात अर्दतेत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील दोन दिवस दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड व गोव्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे , बीड, नगर, धारशिव आणि लातूर येथे हलक्या पावसाची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment