Friday, December 1, 2023

गरीब, महिला, युवा, शेतकरी यांना बळकट करणार : पंतप्रधान मोदी Marathi Live News

 Marathi Live News
 नवी दिल्ली : वृत्तसंस्था : 

गरीब, महिला, युवा, शेतकरी Marathi Live News हीच माझ्यासाठी मोठी जात असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. विकसित  भारत संकल्प यात्रेत टे व्हर्च्युअली बोलत होते. याप्रसंगी त्यांनी जनधन औषध केंद्रांची संख्या १० हजारांवरून २५  हजार केली. यावेळी टे म्हणाले की, माझ्यासाठी गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी ही सर्वात मोठी जात आहे. त्यांना बळकट करून आम्ही भारताला विकसित राष्ट्र बनवू. आमची स्त्री शक्ती, आमची  युवा शक्ती, आमचे शेतकरी आणि आमची गरीब कुटुंब हे आमचे अमृतस्तंभ आहेत. 

गावातील दीदींना ड्रोन दीदी Marathi Live News बनवण्याची घोषणा केली होती. मी पाहिले की, काही १० वी पास आहेत. काही ११ वी आणि काही १२ वी पास आहेत. पण हजारो बहिणी ड्रोन चालवायला शिकल्या आहेत. त्याचा उपयोग शेतीत कसा करायचा. खते आणि औषध फवारणी कसे वापरायचे. हे सगळ त्यांनी शिकून घेतले आहे. खेड्यापाड्यातील बचत गटांमध्ये काम करणाऱ्या दोन कोटी महिलांना लखपती बनवण्याचे माझे स्वप्न आहे. असे मोदी यांनी यावेळी सांगितले. मोदी म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिक, मग तो श्रीमंत असो व गरीब, त्याला स्वस्तात औषधे मिळायला हवीत. लोकांना आजरपणात आयुष्य घालवावे लागू नये. लोकांना शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ मिळावा. असे आवाहन त्यांनी  स्वयंसेवकांना केले. 

काय आहे विकसित भारत संकल्प यात्रा ? 

पीएम मोदींनी झारखंडमधील खुंटी येथून विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात केली होती. याअंतर्गत अनेक ग्रामपंचायतीमध्ये आरोग्य शिबिरे लावणाऱ्या व्हॅॅन धावणार आहेत. ऑन स्पाॅॅट सेवा प्रदान करणे हे याचे उद्दिष्ट  आहे. २६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ९९५ ग्रामपंचायतीमध्ये ५ हजार ४७० आरोग्य शिबिरे घेण्यात आली. यामध्ये ७ लाख ८२ हजारांहून अधिक लोक  आले होते. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...