![]() |
| Marathi Live News |
सावंतवाडी :- आज सावंतवाडी तालुक्यातील गावात रेशन दुकानात मोफत व अल्प दरात धान्य पुरवठा केला जातो. या धान्यात जे तांदूळ वितरीत केले जातात, त्या तांदळात काही तांदूळ हे प्लास्टिक सदृश दिसून आले. हे तांदूळ जर हाताने दाबले असता ते फुटत नाही. दाताने चावले असता तसेच शिजवल्यानंतरही चिवट लागतात, Marathi Live News अशी तक्रार सावंतवाडी तालुक्यातील आरोस, तिरोडा, नाणोस, शेर्ले, माडखोल, इन्सुली, न्हावेली आदि भागातून बऱ्याच लोकांनी मनसेकडे केली.
या विषयाला अनुसरून मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष आशिष सुभेदार, मनसेचे माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक, मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष संदेश सावंत, सुरेंद्र कोठावळे, विद्यार्थी सेना तालुका सचिव मनोज कांबळी, नंदू परब, प्रणित तळकर, Marathi Live News दिलीप नाईक, गुरुनाथ नाईक व इतर मनसैनिक यांनी तहसीलदार यांची भेट घेतली असता पुरवठा अधिकारी यांनी हा तांदूळ प्लास्टीकचा नसून ४५ प्रोटीन युक्त तांदूळ असल्याचे सांगितले.
हे तांदूळ खाण्यायोग्य असल्याचे पुरवठा अधिकारी यांनी सांगितले. पण या तांदळाच्या बाबतीत ग्रामीण भागात लोकांच्या मनात संभ्रल निर्माण झाला असून हे तांदूळ जर खाण्यायोग्य आहेत तर तहसील कार्यालयामार्फत याची जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच सदर तांदळाचे नमुने तपासणीसाठी मनसेमार्फत प्रयोगशाळेत पाठवण्यात येती.
तसेच तहसील कार्यालयामार्फत सुध्दा हे नमुने पाटील यांनी दिली तर सावंतवाडीत ग्रामीण भागात संभ्रम दूर होण्यासाठी जनजागृती करा, अशी मागणी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली असता तशी जनजागृती करण्याची ग्वाही देखील तहसीलदार श्रीधर पाटील यांनी यावेळी दिली.
.jpg)
No comments:
Post a Comment