Tuesday, December 19, 2023

वर्षभरात तुरडाळ ४० टक्क्यांनी महागली ; आता २० रुपयांनी स्वस्त Marathi Live News

Marathi Live News
छत्रपती संभाजीनगर : 

वर्षभरात तुरडाळीच्या Marathi Live News दरात तब्बल ४० टक्क्यांनी घसघशीत वाढ झाल्याने घाऊक बाजारात प्रतिकिलो डाळीचे भाव १७० रुपयांपर्यंत पोहोचले होते. मूग, चणाडाळी महागल्याने सर्वसामन्यांच्या जेवणातून डाळी गायब झाल्या होत्या. मात्र, आता नवीन माल येणार असल्याने तुरडाळ २० रुपयांनी स्वस्त झाली आहे. मुगडाळ १० रुपयांनी उतरली असून, चणा, उडीद आणि मसूरडाळीचे दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

तुरडाळीच्या दरात सातत्याने Marathi Live News वाढ सुरु असल्याने किरकोळ बाजारात प्रतिकिलो दर २०० रुपयांवर जाण्याचे चित्र होते. त्यामुळे तूरडाळीचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करत थेट शेतकऱ्यांकडून खरेदीचा आणि डाळी आयात करण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

तूर मूगडाळ स्वस्त 

या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत डाळींचे भाव तेजीत होते. मात्र, नवीन मालाची आवक असल्याने तुरडाळ २० रुपयांनी स्वस्त होऊन १५० रुपये, मुगडाळ १०८ रुपये तर, चणाडाळ ७० रुपये किलोवरआली. मसूर उडीदडाळीचे दर स्थिर आहेत. 

दराची चढ-उतरण 

  • अपेक्षित पाऊस न झाल्याने जुलैमध्ये तुरडाळीचे दर १४० रुपये किलोवर. 
  • ऑक्टोबरमध्ये तुरडाळ १६२ ते १७० रुपयांपर्यंत महागली. 
  • किरकोळ बाजारात १८० ते १९० रुपये किलो दराने विक्री. 
  • नोव्हेंबर अखरपर्यंत तेजी 
  • मध्यंतरी पाऊस आणि आता नवीन मालाच्या आवकेमुळे बाजार पडला. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...