![]() |
| Marathi Live News |
कणकवली :- कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाल्यानंतर बहुतांश गाड्या विजेवर धावत आहेत. Marathi Live News यामध्ये आणखी दोन गाड्यांची भर पडली असून यात कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याची असणाऱ्या दिवा-सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेसचाही समावेश आहे.
सावंतवाडी-मडगाव-सावंतवाडी पॅसेंजरही आता विजेवर धावणार आहे. दिवा- सावंतवाडी (१०१०५) २ डिसेंबरपासून, Marathi Live News सावंतवाडी-दिवा (१०१०६) ३ डिसेंबरपासून, सावंतवाडी-मडगाव (५०१०७) २ डिसेंबरपासून, मडगाव-सावंतवाडी (५०१०८) ३ डिसेंबरपासून विजेवर धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment