Monday, December 18, 2023

आजरा साखर कारखाना निवडणूक : आज फैसला Marathi Live News

Marathi Live News
आजरा , पुढारी वृत्तसेवा : 

गवसे येथील आजरा तालुका Marathi Live News शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 'अ' वर्गाच्या ७७ आणि 'ब' वर्गाच्या १२ अशा एकूण ८९ केंद्रांच्या मतपेट्यांची ४६ टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी २२५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीत कोण बाजी मारणार याचा मंगळवारी फैसला होणार आहे. दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत कोणत्या आघाडीच्या बाजूने कल आहे. हे स्पष्ट होणार आहे. 

सकाळी सात वाजता तहसील कार्यालयातून मतपेट्या पोलिस बंदोबस्तातून आजरा पंचायत समितीमध्ये नेल्या जाणार आहेत, पंचायत समितीच्या सभागृहात उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर पेट्या खुल्या करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष आठ Marathi Live News वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ४५ तर दुसऱ्या टप्प्यात ४४ पेट्यांची मतमोजणी होणार आहे. पहिली फेरी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान संपणार आहे. 

पहिल्या फेरीतच निकाल कुणाच्या बाजूने लागणार हे स्पष्ट होणार आहे. मतमोजणीची जय्यत तयारी निवडणूक विभागाने केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. पंचायत समितीच्या सभागृहाबाहेर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अंतिम निकाल रात्री उशिरा लागण्याची शक्यता आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...