मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : 
Marathi Live News
अयोध्येतील राम Marathi Live News मंदिराच्या दर्शनासाठी 22 जानेवारीनंतर मुंबईतील सर्व ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे ३६ विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. या विशेष ट्रेनच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना प्रभू रामाचे दर्शन घडविण्याची योजना मुंबई भाजपने आखली आहे ; तर 22 जानेवारी रोजी राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त मुंबईतील प्रत्येक वाॅॅर्डातील दहा हजार घरांंमध्ये दिवे लावून दीपोत्सव केला जाणार असल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी दिली.
प्रत्येक विधानसभेतून Marathi Live News सामान्य नागरिकांना अयोध्येत नेण्यासाठी 22 जानेवारीनंतर विशेष ट्रेन नेली जाईल. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शेलार म्हणाले कि, भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली आहे. प्रतेक राज्यांना केंद्रातून सर्वसमावेशक कार्यक्रम दिला आहे.
No comments:
Post a Comment