Saturday, December 16, 2023

राज्यात रोज २३ नवजात बालकांचा मृत्यू Marathi Live News

 

Marathi Live News

नागपूर , पुढारी वृत्तसेवा :

राज्यात एप्रिल ते Marathi Live News ऑक्टोबर २०२३ या सात महिन्यांत ४ हजार ८७२ नवजात म्हणजे २८ दिवसांपर्यंतच्या बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार दर दिवशी राज्यात २३ नवजात बालकांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येते. त्यापैकी ७९५ बालकांचा मृत्यू श्वसनाच्या त्रासाने झाला आहे. आरोग्य विभागाने राज्यात नवजात शिशूंच्या उपचाराकरिता ५२ विशेष नवजात काळजी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यासंदर्भातील एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.

राज्यातील १६ आदिवासी Marathi Live News जिल्ह्यांत एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत ० ते ५ वर्षे या वयोगटातील तब्बल ४ हजार ३२४ बालकांचा विविध आजारांमुळे मृत्यू झाल्याचे लेखी माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेतील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे. तर सप्टेंबरमधील आकडेवारीनुसार सध्या ७३ हजार ९९८ तीव्र कुपोषित, ४ लाख १७ हजार ३४९ मध्यम कुपोषित बालके असल्याचेही तटकरे यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे.

आदिवासी जिल्ह्यातील बालमृत्युंबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या आमश्या पाडवी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...