Friday, December 29, 2023

जालना - मुंबई वंदे भारत आजपासून धावणार Marathi Live News

 Marathi Live News
नाशिक : पुढारी वृत्तसेवा - 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दी.३०) व्हिडिओ काॅॅन्फरन्सव्दारे जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. नवीन एक्स्प्रेसमुळे नाशिक-मुंबईचा प्रवास अधिक जलद होणार आहे. 

अयोध्या येथून Marathi Live News पंतप्रधान मोदी देशातील पाच वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रारंभ करणार आहेत. मुंबई-जालना एक्प्रेसचा यात समावेश आहे. नव्याने सुरु होणारी रेल्वे शुक्रवार वगळता आठवड्यातून सहाही दिवस धावणार आहे. ताशी १३० किलोमीटर वेगाने वंदे भारत धावणार असून, रेल्वेगाडीला १६ बोग्या आहेत. संपूर्णपणे वातानुकुलीत असणाऱ्या एक्स्प्रेसला छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिकरोड, ठाणे दादर व सीएसएमटी (मुंबई) असे  थांबे असतील. तर प्रतीच्या प्रवासात मुंबई येथून १ वाजून १० मिनिटांनी निघणार असून, नाशिकला ४ वाजून २८ मिनिटांनी पोहोचेल. या नव्या एक्स्प्रेसलमुळे मराठवाडा ते मुंबईचा प्रवास अधिक जलद होणार आहे. 

उद्घाटनाच्या दिवशी Marathi Live News पंतप्रधान मोदी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी निमंत्रित मान्यवर एक्स्प्रेसमधून प्रवास करणार आहेत. दरम्यान, नाशिकरोडमार्गे मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस धावत असून. त्यानंतर मुंबई-जालना एक्स्प्रेस सुरु होत असल्याने नाशिकरांना अधिक जलद मुंबई गाठता येणार आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...