Wednesday, December 6, 2023

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे महामानवास अभिवादन.! Marathi Live News

Marathi Live News
 
सावंतवाडी :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवर, Marathi Live News शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. 

दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, सदा सरवणकर कालिदास कोळंबकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू Marathi Live News भीमराव आंबेडकर, माजी खासदार नरेंद्र जाधव, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष . इ. यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहमुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. बृहमुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

मुंबई महापालिकेतर्फे प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पाऊलखुणा' ही माहिती पुस्तिका मान्यवरांना भेट देण्यात आली. 


















No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...