![]() |
| Marathi Live News |
नागपूर येथे महाराष्ट्र Marathi Live News शासनाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा मोबदला देण्यात यावा. शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून २५००० रु. हेक्टरी मदत जाहीर करण्याबाबदचे निवेदन देऊन खा. प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज ८ डिसेंबर रोजी सकारात्मक चर्चा केली.
मागील काही Marathi Live News दिवसापासून अवकाळी पावसामुळे पूर्व विदर्भात शेतकऱ्यांचे धानपिक, धानाच्या कडपा तसेच शेतात असलेले पूजन्यांना अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतात असलेल्या कडधान्याच्या पीकाचे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानाची तातडीने सर्वेक्षण आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानीचा मोबदला देण्यात यावा. तसेच मागच्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांचा यावर्षी लागणारा मशागतीचा वाढीव खर्च लक्षात घेता डीबीटीच्या माध्यमातून बोनस स्वरूपात २५००० रु. हेक्टरी मदत जाहीर करण्यात यावी. यासंबंधी खा. पटेल यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राजू कारेमोरे, विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, सुनील फुंडे उपस्थित होते.
.jpg)
No comments:
Post a Comment