Sunday, January 14, 2024

गत 8 वर्षांत भारतात श्रीमंतांचे प्रमाण वाढले Marathi Live News

Marathi Live News
वाॅॅशिंग्टन, वृत्तसंस्था : 

गेल्या ८ वर्षांत वर्षाला ८.३० लाख रुपयांवर कमाई करणाऱ्या भारतीयांची संख्या अडीच Marathi Live News पटीने वाढली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांमुळे हे शक्य झाले असल्याचेही या अहवालात म्हटलेले आहे. हाच वेग कायम राहिला, तर येत्या ३ वर्षांतच ही संख्या १० कोटींवर जाईल. असा निष्कर्ष जागतिक बँकिंग समूह 'गोल्डमन सॅॅच' ने आपल्या एका ताज्या अहवालातून काढला आहे. 

भारतीय अर्थव्यवस्था दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. आणि भारतीयांची समृद्धीही वाढते आहे. येत्या काही वर्षांत हे प्रमाण झपाट्याने वाढणार आहे. आगामी ३ वर्षांत भारतातील समृद्ध लोकांची संख्या १० कोटी झालेली असेल. 

भारतीयांच्या समृद्धीची कारणे 

 'गोल्डमन सॅॅच' च्या या Marathi Live News समृद्ध भारत अहवालानुसार गेल्या दशकात अर्थव्यवस्थेत वेगाने झालेली वाढ, स्थिर चलनविषयक धोरण आणि पतवृद्धीचे चढे प्रमाण, यामुळे भारतीयांची भरभराट झाली आहे. 

पुढे काय ?: भारतात श्रीमंत लोकांची लोकसंख्या जसजशी वाढत जाईल, तसतशी चैनीच्या वस्तूंना मागणीही वाढेल. 

दरडोई उत्पन्नाचे आव्हान : भारताचे दरडोई उत्पन्न सध्या सुमारे २,१०० डॉलर म्हणजेच वार्षिक १.७४ लाख रुपये आहे. ते वाढविण्याचे आव्हान आगामी काळात असेल. 

८ वर्षांत अडीच पटीने श्रीमंतवृद्धी 

२०१५ मध्ये भारतात २.4 कोटी लोक वार्षिक ८.३० लाख रुपयांपेक्षा जास्त कमवत होते. 

२०२३ मध्ये ही संख्या ६ कोटी झाली आहे. याचाच अर्थ गेल्या ८ वर्षांत ही संख्या अडीच पटीने वाढली आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...