मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : 
Marathi Live News
मुंबईतून थंडी गायब Marathi Live News झाली असून किमान तापमान वाढ झाली आहे. आयएमडीच्या सांताक्रुझ केंद्रामध्ये गुरुवारी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. यामुळे थंडीपासून मुंबईकर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मंगळवारी रात्री पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा वाढला. किमान तापमानात घट झाली होती. मात्र हवामानातील हा बदल तात्पुरता ठरला. बुधवारपासून किमान तापमान २१ अंश सेल्सिअसवर गेले. गुरुवारी त्यात एका अंश सेल्सिअसने वाढ झाली तर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस इतके होते.
तापमानात थोडी घट होणार
उद्या शुक्रवारी आणि Marathi Live News शनिवारी किमान तापमानात थोडी घट होऊन अनुक्रमे २१ आणि २० अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. थंडी आणि गरम हवामान असले तरी पुढील आठवडाभर मुंबई शहर व उपनगरांत ढगाळ वातावरण राहील.
वरळी, विलेपार्लेत प्रदूषणात वाढ
सिद्धार्थनगर - वरळीसह (एक्यूआय - १८७ ) विलेपार्ले (१८२) येथे गुरुवारी वायू प्रदूषणात वाढ दिसून आली. हवा गुणवत्ता निर्देशाकांची (क्यूआय) ही पातळी खराब श्रेणीत मोडते. नेव्हीनगर, कुलाबा (१७७), मालाड (१७६) आणि माझगाव (१७५) येथील वायू प्रदूषण अतिखराब श्रेणीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
No comments:
Post a Comment