Tuesday, January 2, 2024

लोकसभा निवडणुकीपूर्वी 'सीएए' ची अंमलबजावणी Marathi Live News

Marathi Live News
 नवी दिल्ली , वृत्तसंस्था : 

चालू वर्षात लोकसभा Marathi Live News निवडणुका होतील. आयोगाकडून तारखाही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्त्पुर्विम  'सीएए'  म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीपूर्वीच या कायद्याबाबत अधिसूचना जारी केली जाईल, असा दावा केंद्राशी संबधित सूत्रांनी केला आहे. 

या कायद्याअंतर्ग बांगला देश, पाकिस्तान आणि अफगाणीस्तानमधील बहुसंख्याक मुस्लिमांच्या छळाला बळी पडलेल्या हिंदू,शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांना भारताचे नागरिकत्व बहाल केले जाईल. 

माध्यमांत Marathi Live News झळकलेल्या वृत्तानुसार , गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच  'सीएए' च्या अंमलबजावणीबाबत सरकारकडून मार्गदर्शक नियमावली जारी केली जाईल, असेही या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. नियमावली जारी होताच कायद्याची अंमलबजावणी केली जाईल आणि पत्र पीडितांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. कायद्याला चार वर्षे लोटली असून, अंमलबजावणी साठीच्या नियमावलीला हिंसाचार, जाळपोळ व अन्य इतर कारणांनी विलंब झाला आहे. तडकाफडकी अंमलबजावणी साठी ऑनलाईन पोर्टलही तयार असून, नागरिकत्व देण्याची ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...