![]() |
| Marathi Live News |
नवी दिल्ली :
नितीशकुमार यांनी Marathi Live News इंडिया आघाडीची साथ सोडून एनडीएचा रस्ता पकडल्याने राजकारणात खळबळ उडाली असली. तरी तृणमूल काँँग्रेसच्या नेत्या ममता बॅॅनर्जी यांनी मात्र नितीशकुमारांची एक्झिट हे इंडिया आघाडीसाठी सुचिन्ह असल्याचे म्हटले आहे. नितीशकुमार यांच्याबाबत ममतांच्या मनात आधीपासून शंका होती.
बिहारच्या राजकीय उलथापालथीच्या हालचाली दिल्ली आणि पाटण्यात सुरु असताना नितीशकुमार एनडीएममध्ये जाणार असल्याचे जवळपास नक्की झाले आहे. नितीश यांचे बाहेर जाने हा इंडिया आघाडीला धक्का मानला जात असला. तरी याबाबत ममता बॅॅनर्जी यांच्या प्रतिक्रियेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजभवनावर पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना ममता Marathi Live News बॅॅनर्जी म्हणाल्या की, बिहारमध्ये नितीश सरकारबाबत असलेली अँँटी इन्कम्बन्सी इंडिया आघाडीला महागात पडली असती. नितीशकुमार महागठ बंधनमधून बाहेर पडणे हे काही राजद आणि काँँग्रेससाठी नुकसानीचे नाही. उलट नितीश राजससोबत युती करून लढले असते. तर त्यांना ४० पैकी ६ ते ७ पेक्षा अधिक जागा मिळाल्या नसत्या.
ममता बॅॅनर्जी यांच्या निकटव्रतीय सूत्रांच्या मते, ममता बॅॅनर्जी यांच्या मनात नितीश यांच्यासोबत कायमच शंका आहे. विरोधकांच्या आघाडीबाबत ते किती कटिबद्ध आहेत याची शाश्वती नसल्यानेच ममता बॅॅनर्जी यांनी नितीश यानैन्दिया आघाडीचे संयोजक नेमण्याला विरोध केला होता.
हा तर भाजपचा कट
सूत्रांनी म्हटले आहे कि, नितीशकुमारांना इंडिया आघाडीचा संयोजक नेमायला लावायचे आणि त्यानंतर त्यांना एनडीसोबत जोडून घ्यायचे हा भाजपचाच कट होता. एनडीएसोबत जोडून घ्यायचे हा भाजपचाच कट होता. ममता बॅॅनर्जी यांना या भाजपच्या या कटाची पूर्वकल्पना होती म्हणूनच त्यांनी नितीश यांच्या नावाला विरोध केला. तृणमूलच्या वरिष्ठ नेत्याने पुढे सांगितले कि, नितीशकुमार यांच्यबाबत ममता बॅॅनर्जी यांच्या भूमिकेला अरविंद केजरीवाल. उध्वव ठाकरे आणि अखिलेश यादव हेही सहमत होते.
जागावाटपाबाबत
इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत ममता बॅॅनर्जी म्हणाल्या कि, बंगालच्या जागावाटपाबाबत बोलणी सुरु होण्याआधीच आम्ही त्यांना दोन जागा देण्याची तयारी दर्शवली होती. पण त्यांनी ती नाकारली. आता बंगालात इंडिया आघाडी एकत्र न लढण्याचे खापर काँँग्रेसवर फुटणार आहे.
भाजपला विरोधच करणार
शुक्रवारी बिहारच्या घडामोडी वेगात सुरु झाल्यानंतर पत्रकारांनी ममता बॅॅनर्जी यांना नितीशकुमार यांच्या जाण्याचा भाजपला फायदा होणार का, असा प्रश्न विचरला असता त्यांनी काहीही होवो. आम्ही भाजपला विरोधच करणार, असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली होती.

No comments:
Post a Comment