Tuesday, January 30, 2024

राम मंदिराचे काम १५ फेब्रुवारीपासून पूर्ववत होणार Marathi Live News

Marathi Live News
पुढारी ऑनलाईन डेस्क : 

२२ जानेवारी रोजी Marathi Live News नव्या राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापना पूर्ण झाल्यानंतर अयोध्येत भक्तांची वर्दळ वाढली आहे. मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसातच कोट्यावधींचे दान भक्तांकडून अर्पण करण्यात आले आहे. या भव्य अभिषेक सोहळ्यानंतर अयोध्येतील रामजन्मभूमी संकुलातील अपूर्ण काम आता पुन्हा सुरु करण्याची तयारी सुरु आहे. १५ फेब्रुवारीपासून हे कम सुरु करण्यात येणार आहे. 

मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनामुळे मंदिरातील बांधकाम काहीकाळासाठी बंद करण्यात आले आहे. आता हे काम पूर्ण पूर्ववत होणार आहे. मंदिराच्या पश्चिमेला पुन्हा दोन Marathi Live News टाॅॅवर क्रेन उभारण्यात येत असून कामगारही १५ फेब्रुवारीला येथे पोहोचतील अशी माहिती आहे. 

राम मंदिराचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा हे याबाबत बोलताना म्हणाले की, सध्या मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. काही दिवस बांधकामात गुंतलेली मशिन काढून टाकण्यात आली होती. आता ती पुन्हा स्थापित केले जाणार आहेत. एल अँँड टिचे कामगारही आठवडाभरात परततील, त्यानंतरच कामाला वेग येईल असे मिश्रा म्हणाले, 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...