![]() |
| Marathi Live News |
वाई : महाबळेश्वर तालुक्यात इको सेन्सिटिव्ह झोन व बांधकाम निषिद्ध क्षेत्रात पर्यावरणाला अडथळा ठरणाऱ्या भिलार कासवंड, भोसे, पांगरी, खिंगर येथील अनधिकृत बांधकामेMarathi Live Newsसातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाईच्या प्रांताधिकाऱ्यानी मोठ्या पोलीस बंधोबस्तात तोडण्यास सुरुवात केली आहे.
महाबळेश्वर तालुका नेहमीच अनधिकृत बांधकामासाठी चर्चेत राहिलेला आहे. पर्यावरण प्रेमींनी मुख्यमंत्र्यांंकडे येथील अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी अशी अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश सातारा जिल्हाधिकाऱ्यांंना दिले होते. त्याप्रमाणे आज सकाळी पर्यावरणाला अडथळा ठरणाऱ्या भिलार, भोसे, खिंगर येथील अनधिकृत बांधकामे काढून घेण्याबाबतMarathi Live Newsसर्वांना नोटीस बजावण्यात आली होती.
या बांधकामावर जिल्हा प्रशासनाने आज सकाळी हातोडा उगारला. प्रशासनाने जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने इमारतीचे बांधकाम उद्ध्वस्त करण्याचे काम सुरु केले. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तेजस्विनी पाटील, वाई तहसीलदार सोनारी मेटकरी, खंडाळा तहसीलदार विजय पाटील यांच्यासह अनेक नायब तहसीलदार, महसूल अधिकारी, कर्मचारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त यासाठी तैनात करण्यात आलेला आहे.
आज मह्सुलचे शंभराहून अधिक कर्मचारी-अधिकारी आणि दीडशे पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तात हे काम करण्यात आले. यामुळे अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आता हि मोहीम कोणतीही तडजोड न करता, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कायम सुरु राहावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

No comments:
Post a Comment